दलित वस्ती विकास निधीच्या अंतर्गत मंजुर झालेली उत्तर महाराष्ट्रातील कामे त्वरित सुरू करा-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे याची मागणी.




नाशिक शांताराम दुनबळे                      नाशिक-:नाशिक रोङ येथे नुकतेच 
 मंगळवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या वतीने नाशिक विभागीय महसूल आयुक्त मा.राधाकृष्ण गमे साहेब यांची महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषया अंतर्गत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक येथील दलित विकास निधी अंतर्गत मंजूर झालेली कामे कोरोना काळात रखडली असून ती कामे त्वरित सुरू करण्यात याव्यात अन्यथा रि.पा.ई तर्फे महसूल आयुक्त कार्यालयासमोर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.

याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोदजी बागुल,रिपब्लिकन फेडरेशनचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विशालभाऊ घेगडमल,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने