अनुराग पाटील महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत १० वा, अभिनंदनाचा वर्षाव





शिरपूर : दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित अमरिशभाई आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूल चा विद्यार्थी अनुराग किशोर पाटील याने फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक  शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १० व्या क्रमांकाने व जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने घवघवीत यश संपादन करून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.

अनुराग पाटील याने प्राप्त केलेल्या राज्यभरातील गुणवत्ता यादीतील यशामुळे संस्थेच्या, शाळेच्या व शिरपुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या यशाबद्दल कौतुक करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी अनुराग पाटील व विद्यालयाचे प्राचार्य निश्चल नायर यांचा सत्कार तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) फेब्रुवारी २०२० मध्ये राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या ७ विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दि. २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे येथे होणाऱ्या शासकीय समारंभामध्ये  पालकमंत्री यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे.

अनुराग पाटील याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व संचालक, शाळेचे प्राचार्य निश्चल 
नायर, उपप्रचार्या सौ. अनिता थॉमस, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने