दिग्दर्शक अमोल राजेंद्र लोंढे यांनी `यारीया' या चित्रपटातुन २०२१ ची केली दमदार सुरुवात.




नाशिक शांताराम दुनबळे    
               नाशिक-:युवा लेखक आणि दिग्दर्शक अमोल राजेंद्र लोंढे यांनी `यारीया' या मैत्रीवर आधारित एका छोट्याशा चित्रपटातुन २०२१ ची सुरुवात केली असुन चित्रिकरण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पुणदी या खेडेगावात करण्यात आले आहे. ``ग्रामीण भागातील भाषाशैलीतले संवाद वापरून एकदम खेडेगावातली हि मित्रांवर आधारित कथा असुन प्रत्येकाला आवडेल अशी आशा आहे. कुणाचेही मन दुखावले जाईल असे संवाद,कथा,पटकथा नाहीये. २०२०मध्ये एकापाठोपाठ ६ गाण्यांच दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रिकरण केलं आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला असुन कौतुकाची थाप आणि ओळख मिळत आहे.'' असं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. एकापाठोपाठ ६गाण्यांनंतर ते पुन्हा एकदा चित्रपटाकड वळले असुन त्यांनी लिहिलेली `यारीया' हि कथा त्यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकारांना घेऊन दिग्दर्शित केली आहे. याची निर्मिती `दोस्ती फिल्म्स' या निर्मीती संस्थेने राज हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली
 केलेली आहे. कलाकार म्हणून स्वप्नील घुले, गणेश लोंढे,प्रमोद हाके,ऋषी लेंगरे,ओम जावळे,यश क्षिरसागर, प्रतिक्षा क्षिरसागर,प्रविण क्षिरसागर, सुहास गिरी यांनी काम केलं आहे. याच चित्रिकरण सुरज गिरी आणि अनिकेत गवळी यांनी `आपलं प्रोड्क्शन' या प्रोड्क्शन टिम ने केलं आहे. लवकरच आपल्याला `यारीया' बघायला मिळेल.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने