एस. व्ही. के. एम. संस्थे तर्फे धुळे जिल्ह्यातील १७ वर्षांआतील क्रिकेट खेळाडूंना सुवर्णसंधी, धुळे येथे दि. १० जानेवारी रोजी निवड चाचणी

 




शिरपूर : धुळे जिल्ह्यातील १७ वर्षांआतील क्रिकेट खेळाडूंसाठी सुवर्णसंधी चालून आली असून श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने अध्यक्ष तथा माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्था सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू यांच्या साठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दि. १० जानेवारी रोजी धुळे येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

श्री विले पार्ले केळवाणी मंडळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांसाठी सारथी स्पोर्ट्स क्लब, धुळे यांचे देखील विशेष सहकार्य लाभत आहे.

शिरपूर शहरात धुळे जिल्ह्यातील १७ वर्षाआतील मुलांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून सदर स्पर्धेत खेळाडूंना साखळी पद्धतीने सामने खेळण्याचा आनंद मिळणार आहे. सर्व सामने शिरपूर येथील टर्फ खेळपट्ट्या व हिरवेगार मैदानांवर खेळवले जाणार असून खेळाडूंना मोफत गणवेश, जेवण व निवासाची सोय श्री विले पार्ले केलवाणी मंडळ यांच्याद्वारे शिरपूर शहरात करण्यात येणार आहे. एकंदरीत जिल्ह्यातील सर्व तरुण क्रिकेट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळण्याचा अनुभव मिळावा या उदात्त हेतूने संस्था वरील आयोजन व नियोजन करीत आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील खेळाडूंसाठी धुळे शहरात दि. १०/१/२०२१ रविवार रोजी सारथी अकॅडमी, (प्रियदर्शिनी क्लब), आसाराम आश्रम जवळ, साक्री रोड, धुळे येथील मैदानावर निवड चाचणी घेतली जाणार आहे. 
इच्छुक खेळाडूंनी क्रिकेट गणवेशात व आपल्या क्रिकेट साहित्या सोबत सकाळी ८.३० वाजता उपस्थित रहावे. निवास व वयाच्या पुराव्यासाठी खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, जन्म दाखला, स्कूल बोनाफाईड यापैकी एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी. या भव्य व आकर्षक स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. निवड चाचणी साठी सारथी स्पोर्ट्स क्लब, धुळे येथील पदाधिकारी
विजय पंजाबी (९४२२७५६१२४), देवा मोरे (९३२५३१४८६५), स्वप्निल निकुंभ (७८८७३६१८८४) यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आयोजक यांनी कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने