शिरपूर : येथील आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापिका ज्योती आधार चौधरी यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील डॉक्टरेट पदवी प्रदान झाली.
याबद्दल महाविद्यालयात प्रा. ज्योती चौधरी यांचा संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांच्या पीएच. डी. संशोधनाचा विषय "धुळे जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक सक्षमीकरणात शिक्षणाच्या भूमिकेचा अभ्यास" हा होता. त्यांना पीएच. डी. चे गाईड म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंतकुमार देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. ज्योती चौधरी या मागील वीस वर्षापासून शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध विविध मासिकात प्रकाशित झालेले आहेत व अनेक परिसंवादात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. वाय. देवरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व व प्राध्यापकतेर कर्मचारी यांनी कौतुक केले.