शिरपूर - आज दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पंचायत समितीमार्फत प्रत्येक तालुक्यास घरकुलची एक डेमो इमारत उभारण्यात येत आहे. त्यामुळे कमी खर्चात गरजू लोकांनी घरकुल कसे बांधावे याचे उत्कृष्ट मॉडेल तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत परिसरात बांधण्याकरिता आज विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
याप्रसंगी आमदार अमरिषभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल मार्गदर्शनाने तालुक्याचे आमदार. काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, करवंद गणाच्या पंचायत समिती सदस्या वैशाली सोनवणे, मा. नगरसेवक अशोक कलाल, गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, उपअभियंता अमर पाटील, सहाय्यक घरकुल अभियंता विकेश पाटील, हेमराज पाटील, नवनिर्वाचित ग्रा.पं सदस्य सुनील भटू सोनवणे, मोहिनी माळी, स्वाती बागुल, सुनील श्रावण सोनवणे,सीमा सोनवणे, शत्रुघ्न मोरे, अक्काबाई भिल,भटू नामदेव माळी, छगन बागुल, श्रावण सोनवणे,राजेंद्र माळी, दिनेश सोनवणे,गजु पाटील, सुशील सोनवणे, तुषार सोनवणे, भारत साळी, विलास पाटील, गोकुळ थोरात, गणेश भिल, दिलीप इंदासराव,जितेंद्र बागुल, रामसिंग राजपूत, निलेश मराठे, विश्वास ठाकूर, विजयसिंग परदेशी,दशरथ पाटील, नामदेव गोपाळ,जितेंद्र चित्ते, चेतन सोनवणे,यतीश सोनवणे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन प्रशासक एन आर पाटील व ग्रामसेवक संतोष वाघ यांनी केले.
आलेल्या सर्व मान्यवरांचे मांडळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजकांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
