शिंदखेडा (प्रतिनिधी) : संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचात निवडणुकीचा बिगुल वाजला असून धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये जवळजवळ शंभर ग्रामपंचायतीत निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसुल व ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा ना.श्री.अब्दुल सत्तार व शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात हे धुळे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचे उपस्थितीत दोंडाईचा येथे सुवर्णकार मंगल कार्यालय, रोटरी आय हॉस्पीटल मागे, स्टेशन भाग, दोंडाईचा येथे पदाधिकारी मेळावा आयोजीत केला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुक्याच्या आमदार सौ.मंजुळाताई गावीत, माजी आमदार भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी, सहसंपर्कप्रमुख श्री.अतुल सोनवणे, शिंदखेडा विधानसभा संपर्कप्रमुख श्री.अनिल डेरे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व इतर संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी केले आहे.
Tags
news
