बदलापुर गृहनिर्माण सोसायटी महासंघाची सभा उत्साहात संपन्न.



बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-शहरातील गृहनिर्माण संस्था(हौसिंग सोसायटी)एकत्र याव्यात, प्रत्येक सोसायटीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत,या उद्देशाने बदलापुर गृहनिर्माण सोसायटी महासंघाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने नुकताच अष्टविनायक संकुलासमोर, घोरपडे चौक,कात्रप,बदलापुर(पुर्व),महासंघाचे अध्यक्ष सुनिल दळवी यांच्या नेतृत्वाखाली सभा आयोजित करण्यात आली होती.सभेमध्ये महासंघाची व्याख्या व उद्दीष्टे,रचना,कार्यपद्धती,सदस्यांची संख्या,शहरातील प्रमुख नागरिक प्रश्न,वीज पुरवठा, पाणी पुरवठा,कायदा व सुव्यवस्था, नगरपालिका व नागरीक हितसंबंध,या विषयांवर सार्वाधिक सदस्यांनी आपले विचार मांडले. दिलीप नारकर यांनी सोसायट्यांचे प्रश्न व सोसायटी महासंघासंदर्भात विविध मुद्यांनवर उदाहरणादाखल उदभोदक विचार मांडले.मुख्य निमंत्रक व मार्गदर्शक बाळासाहेब सावंत यांनीही आपले विचार मांडले. तसेच किशोर गुरव,मंगेश सावंत,चंद्रकांत चिल्ले,राजाराम रासकर,दत्ताराम पोसम,बदलापुर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव, सौ.सुजाता सावंत,विलास भिकारे,गिरीश सावंत,चंद्रकांत पाटील यांनी आपले विचार उपस्थितांसमोर मांडले. बैठकीमध्ये विचारांची देवाण-घेवाण झाली
सकारात्मक चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेचे सुत्रसंचालन, प्रस्तावना व आभार प्रदर्शन महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र नरसाळे यांनी उत्कृष्टरित्या केले. सभेला शहरातील ५०पेक्षा जास्त सन्माननिय,उच्चपदस्थ-उच्चशिक्षित व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने