शिरपूर प्रतिनिधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वासंती सी यांनी शिरपूर पंचायत समितीमध्ये 14 वा वित्त आयोग, 15 वा वित्त आयोग पेसा, निधी व घरकुल योजना इत्यादी योजनांच्या आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत खोतकर सो, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए .जे. तडवी,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मोहने, गटविकास अधिकारी वाय डी .शिंदे सर्व विभागांचे विस्तार अधिकारी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता जूनियर इंजीनियर, ग्रामसेवक इत्यादी या बैठकीस उपस्थित होते .
सदर बैठकीमध्ये 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग याअंतर्गत निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट दिले असताना देखील शिरपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आपला खर्च हा अखर्चित ठेवल्यामुळे या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. शिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना शिस्त भंगाची नोटीस आणि निलंबनाचे आदेश देखील देण्यात आले. शासनाने निधी उपलब्ध करून दिला असताना देखील आपल्या स्तरावरून तो खर्च करण्यात दिरंगाई होणे ही ही बाब प्रशासकीय दृष्ट्या अशोभनीय असून प्रत्येकाने आपले जबाबदारीचे भान पाडून लवकरात लवकर कामांचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आदेश यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यात त्यांनी गाव निहाय मिळालेला निधी खर्च ,झालेला निधी शिल्लक, रक्कम ,पूर्ण कामे ,आणि अपूर्ण कामे इत्यादींची आकडेवारीसह आढावा घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्याची अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देण्यात आले. सदर बैठकीस अनेक ग्रामसेवकांनी दांडी मारल्याचे देखील दिसून आले .या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेला विसंवाद व नियोजनाचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली . यापुढील आढावा बैठकीत सविस्तर आकडेवारीसह हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. शिवाय जल जीवन मिशन स्वच्छ, भारत मिशन आणि महा आवास योजना व विविध वित्त आयोगाच्या आलेला निधी व पेसा अंतर्गत आलेला निधी मुदतीच्या आज खर्च करण्याच्या बाबत व विकास कामे पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले.
Tags
news
