एक दिवस ई.डी.च भा.ज.पा.ला संपवणार; ⭕धनंजय मुंडेंचा हल्लाबोल......



पुणे - आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यापर्यंत जाणं आणि कोणत्याही गोष्टीत ई.डी.चा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 
एक दिवस हे ई.डी.च भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य लिहून घ्या,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भा.ज.पा.वर जोरदार हल्लाबोल केला. 
शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील ई.डी.च्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भा.ज.पा.वर निशाणा साधला. 
पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
 यावेळी धनंजय मुंडे यांनी जातीयवाचक नावं हटवण्याच्या निर्णयाबाबतही भाष्य केलं.
 “जी जातीयवाचक नावं सरकारी रेकॉर्डवर आहेत ती पहिले काढली पाहिजेत असा प्रस्ताव आपण समोर आणला. 
तो प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
 त्यानंतर जो नियम केला जाईल त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या जातील,” असंही ते म्हणाले. 
धनंजय मुंडे “शरद पवार यांचं आयुष्य महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेच्या विकासासाठी गेलं आहे.
 ज्या जबाबदारीमध्ये आम्ही आहोत आमच्या विभागामार्फत जनतेच्या उपयोगी योजना त्यांच्यासमोर आणणं सामान्य व्यक्तींचा फायदा होणं ही सर्वात मोठी भेट शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असू शकते,” असंही मुंडे म्हणाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने