भारतीय कामगार सेना धुळे जिल्हा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी विजय सिसोदे यांची नियुक्ती




*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा येथील नरडाणा ग्रोथ सेंटर व शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे आहेत. शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीण मधील कामगारांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. सदर कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक दिवसांपासून भारतीय कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष नेमावा म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके प्रयत्नशील होते. त्यांना यश येवून नरडाणा येथील विभागप्रमुख श्री.विजय सिसोदे हे आता श्रीजी वायर नरडाणा येथे कार्यरत आहेत. अनेक वर्षापासून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी ते अग्रेसर आहेत. त्यांची नियुक्ती शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या धुळे जिल्हा (ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी श्री.सिसोदे यांचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
         वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते खासदार श्री. संजय राऊत साहेब, उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक श्री.रविंद्र मिर्लेकर साहेब, संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांच्या शिफारशीनुसार शिवसेनेचे नरडाणा विभागप्रमुख श्री.विजय भिमराव सिसोदे यांची नियुक्ती झाली. तसेच त्यांच्या हातून कामगार, सर्व सामान्यांची सेवा घडावी… संपुर्ण धुळे जिल्हा (ग्रामीण) मध्ये कामगार सेनेचे संघटन उभे करावे, अशी अपेक्षा श्री.साळुंके यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.सिसोदे यांचे समस्त पदाधिकारी-शिवसैनिकांनी अभिनंदन केले.
       याप्रसंगी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, तालुका प्रमुख गिरीश देसले, उपतालुकाप्रमुख संतोष देसले, शहरप्रमुख सागर देसले, हातनुरचे माजी सरपंच प्रा.ए.व्ही.पाटील, रमेश बोरसे, पं.स.सदस्य भगवान पिंपळे, युवासेनेचे गणेश परदेशी, प्रदीप पवार, मनोज पवार, बन्सीलाल पाटील, ॲड.वसंत पाटील, नेवाडेचे सरपंच लक्ष्मीकांत साळुंके, संदीप निकम, भुषण पाटील, हेमंत सैंदाणे, दिपक बोरसे, सुकदेव बागुल, स्वीय सहाय्यक दिपक जगताप, स्वीय सहाय्यक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने