"धुळे। :--रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, देश व समाज हितासाठी, मुख्यमंत्री ना. ऊद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष व समन्वय समितीच्या वतिने धुळ्यात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 16 12 2020 रोजी सकाळी 10 वाजता , जुन्या शासकीय रुग्णालयात, संघटनाध्यक्ष महेश घुगे यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न होणार्या या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे ऊदघाटन जिल्हाधिकारी संजय यादव यांचे हस्ते होणार आहे. या शिबीराला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सागळे, शासकीय रक्तपेढीचे समन्वयक डॉ. दिपक शेजवळ यां मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले आहे. ऊपस्थितीचे व शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी तथा नोडल आँफीसर डॉ. विशाल पाटील आणि स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष व समन्वय समितीचे सचिव संतोष जैन यांनी केले आहे.
Tags
news
