वणावल - दि.9 डिसेंबर रोजी वनावल जि. प. गटातील टेम्भे ते टेकवाडे, टेम्भे ते भरवाडे ,टेम्भे ते रुदावली या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढले होते. रस्त्यावर लोकांना वाहतुकीसाठी व शेतमाल काढण्यासाठी अडचणी येत होत्या.
आज रोजी पंचायत समिती सदस्या ममता ईश्वर चौधरी यांच्या स्थानिक निधीतून व जि. प.सदस्य प्र. भरत भिलाजी पाटील यांच्या प्रयत्नातून काटेरी झाडे, झुडपे काढण्याचे कामाचे उद्घघाटन करण्यात आले.उद्घघाटन प्रसंगी जि. प.सदस्य भरत भिलाजी पाटील,प.स.सदस्या ममता ईश्वर चौधरी शि. सा. कारखाना व्हायचेअरमन दिलीप दगडू पटेल,टेम्भे गावाचे जेष्ठ नागरीक निंबा मोहनसिंग राजपूत या सर्वांनी नारळ फोडून कामाला शुभारंभ केला.
कार्यक्रमात उपस्थित टेम्भे गावाचे सरपंच देवेसिंग मंगलसिंग राजपूत ,उपसरपंच जयसिंग भगवानसिंग राजपूत, भगवनसिंग नारायणसिंग राजपूत, भगवनसिंग राजपूत, रामसिंग राजपूत, कोमलसिंग राजपूत, गोरखसिंग राजपूत,नथा राजपूत, हरेसिंग राजपूत, सुरेश कढरे,संदीप भिल , भरवाडे सरपंच दिलीप दगडू पटेल, ईश्वर भाई, डॉ.बन्सीलाल पटेल, देवा तात्या,लखन चौधरी,मनोज गुजर,घनश्याम चौधरी तसेच टेकवाडे येथील सरपंच संजुभाऊ धनगर, बापु पारधी,तसेच रुंदावली येथील सरपंच संजय हिंमतराव सोनवणे, उपसरपंच पितांबर भगवान पाटील,समाधान भवर व ग्रामसेवक .चांदपुरी गावातील अर्जुन बाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य लिलाचंद पाटील, अविनाश पाटील,राजधर पाटील, भावेश पाटील तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Tags
news
