धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगाम 2020- 2021 मध्ये तुरीची हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन
नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, धुळे व नंदुरबार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये
कळविले आहे.
मूग, उडिद
व सोयाबीनपाठोपाठ आता राज्य शासनाच्या नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत
हंगाम 2020- 2021 करीता तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात येणार
आहे. त्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रे निश्चित
करण्यात आली आहेत. मार्केटिंग फेडरेशनकडून तुरीला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात येणार असून
28 डिसेंबर 2020पासून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी
करता येईल.
खरीप हंगामातील
तूर बाजारात विक्रीस येण्यास सुरवात झाली असून नाफेडकडून तुरीला (एफएक्यू
दर्जा) सहा हजार रुपये हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
तूर विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
तूर उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन पोर्टलवर तूर विक्रीसाठी नोंदणी करता
येईल. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढील ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन
नोंदणी प्रकिया सुरू झालेली आहे. तसेच नोंदणी साठी शेतकऱ्यांनी
आधारकार्ड, चालू हंगामाचा पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा
उतारा व खाते चालू असलेले बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक
आहे.
नोंदणी केलेल्या
शेतकऱ्यांना केंद्राकडून एसएमएस पाठविण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना विशिष्ट
तारखेला एसएमएस प्राप्त झाला त्यांनी दिलेल्या तारखेला तूर विक्रीस आणावी. नोंदणीचे ठिकाण असे (अनुक्रमे नोंदणीचे ठिकाण, संपर्क सेवकाचे नाव व मोबाईल
क्रमांक) : धुळे तालुका खरेदी-
विक्री आणि प्रक्रिया सोसायटी, धुळे,
स्वप्नील देवरे,
8888088483, शिरपूर तालुका सहकारी खरेदी-
विक्री सोसायटी लि. शिरपूर, जि. धुळे, दर्शन देशमुख, 9422123929, शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे, भगवान पाटील, 9284429877, शेतकरी सहकारी संघ लि. साक्री, ता. साक्री, जि. धुळे, भूषण ठाकरे, 9049814848, शेतकरी सहकारी संघ लि. नंदुरबार, जि. नंदुरबार, दीपक पांढरे, 9130809012, शहादा तालुका सहकारी खरेदी-
विक्री संघ लि. शहादा, जि. नंदुरबार, सागर पाटील, 7770074177.
