दि शिरपुर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठीएक दिवसीय लाक्षणिक उपोषण




शिरपूर प्रतिनिधी-  शिरपूर शहरातील शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड या बँकेतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी तक्रार सादर केली होती .मात्र या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी आज दिनांक 29 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ए. आर. ऑफिस समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. बोरसे यांनी आपली तक्रार मध्ये बँकेचे चेअरमन प्रसन्ना जैन व कर्मचारी संजय कुलकर्णी यांच्या  गैर कारभाराबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यात त्यांनी असुरक्षित कर्ज वाटप, संचालकांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्ज, व्याज न भरता दर वर्षी रीनुवल होणाऱ्या कर्ज प्रकरण, तसेच भंडारा ,गणपती ,शोभायात्रा या नावाखाली दिलेल्या देणग्या इत्यादींबाबत चौकशीची मागणी केली होती. मात्र सगळी चौकशी न झाल्यामुळे त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या इशारा दिला होता.  म्हणून आज प्रहार संघटनेच्या निवडक कार्यकर्त्यांसह एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने