शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात पोलीस विभागाकडून सातत्याने गांजा शेतीवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने स्वतः देखील पथक स्थापन केले असून या संयुक्त पथकांच्या माध्यमाने देखील तालुक्यातील अवैद्य गांजा शेतीच्या शोध घेतला जात आहे. धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सो यांच्या कार्याला तालुक्यातील बोर पाणी येथील गांजा शेतीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात आलेत आले होते .त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी एक पथक तयार करून अभिषेक पाटील यांनी आपल्या पथकासह माहितीचा माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता दिनांक 14 डिसेंबर रोजी बोर पाणि शिवारात संभा वालजी पावरा हे करत असलेल्या शेतात पिकांच्या आडोशाला अवैधरित्या गांजाची झाडे लावण्याचे आढळून आले सदर कारवाईत 52 हजार 880 रुपये किमतीच्या एकूण 26.340किलो वजनाच्या गांजा सदृश्य अमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे, पाने व फांद्या असलेले मुळासह झाडे जप्त करण्यात आली .पोलीस रेड पडल्याचे पाहून आरोपी फरार झाला आहे त्यामुळे सदर आरोपी विरोधात पोलीस शिपाई संदीप चंद्रकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर दीपक वारे करत आहेत .
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंदित ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि माने यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
Tags
news
