शहादा प्रतिनिधी =कृष्णा कोळी
शहादा(नंदुरबार):नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना मामाचे मोहिदा ता. शहादा येथील युवकास पोलिस उपनिरीक्षक यांने बेधम मारहाण केली.त्याचा कांनसिलावर जास्त मार पडल्याने त्याच्या कानेचा पर्दा फाटल्याने त्याच्यावर नंदुरबार सिविल येथे उचार सुरू असून,शहादा ता.उपनिरक्षक यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.यासाठी वंचित बहुजन आघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित जिल्हा अध्यक्ष अरुण रामराजे,पिडीत कुटुंब यांचे वडील संजय अशोक पिपळे व मामा कैलास महिरे शहादा ता.अध्यक्ष गजेंद्र निकम युवा जिल्हा अध्यक्ष दिनेश सामुद्रे ता.उपाध्यक्ष रवि मोरे,रिपाई चे अप्पा वाघ.युवा आघाडी चे गौतम इदवे इ.उपस्थित होते.एस पी पंडीत यांनी दोन दिवसात कारवाई करण्यात येईल असे सांगितले तसेच दोन दिवसात उपनिरक्षक यांच्यावर योग्य ती कारवाही करण्यात यावी.अन्यथा वंचित बहूजन आघाडी नंदुरबार जिल्हा व शहादा तालुक्याचा वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.तसेच सिवील हॉस्पिटल मधे जावून सिवील सर्जन सातपुते यांना योग्य उपचार व्हावेत ज्यात कानाचे त्वरित ऑपरेशन करायला सांगितले. तरी या पीडित कुटबांसोबत अन्याय होऊ नये यांची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी.अन्यथा दोन दिवसा नंतर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित चे जिल्हा अध्यक्ष अरुण रामराजे यांनी दिला आहे.
Tags
news
