शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर येथील रहिवाशी व दलित समाजातील कु. मंगला बन्सीलाल पवार हिस दिनांक 5/12/2020 शनिवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून कंपेरेटीव स्टडी ऑफ सिंथेटिक हार्मोन्स इन्डयुस्ड ब्रीडींग ऑफ इंडियन मेजर कारप्स वीथ रेफरन्स टु एंडोक्राइन मीकॅनिझम" या विषयावर संशोधनात मान्यता देऊन त्यांना पीएच.डी. प्रदान केली आहे, त्यांनी आपले संशोधन औरंगाबाद येथील आझाद महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.अथर उद्दीन कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. डॉ. मंगला पवार या शिरपूर शहरातील एस. पी. डी. एम. कॉलेज ची माजी विद्यार्थिनी असून जुने भामपूर येथील कालकथीत बन्सीलाल धना पवार व राजस बाई यांच्या सुपुत्री आहे. त्याच बरोबर सेवानिवृत्ती सहाय्यक परिचारिका बेबी बाई थूल ,संतोष पवार, भरत पवार शरद पवार यांची लहान बहीण असून सेवानिवृत्त पर्यवेक्षक बी. सी. थूल यांची मेहुणी आहे.
तिच्या या यशाबद्दल माजी मंत्री मा अमरिशभाई पटेल, आ. कांशीराम दादा पावरा, जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रधे, जुने भामपूर येथील सरपंच चंद्रकांत पाटील, बी. एच. पवार व समाज बांधव आणि परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
Tags
news
