इंदिरानगर वार्ताहर : पंचवटी स्थित रजनी हॉस्पिटलमध्ये १० दिवसांपूर्वी एक महिला आपल्या पोटात दुखत असल्याने डॉ विनोद महाले,स्त्री रोग तज्ञ यांच्याकडे तपासणी करण्यासाठी आली त्यावेळी डॉ विनोद महाले यांना महिलेच्या पोटात मोठी गाठ असल्याचा संशय आला त्यावेळी डॉक्टरांनी सदर महिलेस सोनोग्राफी करण्यास सांगितले व त्यात गर्भपिशवीच्या जवळ साधारणतः १५ cm येवढी गाठ असल्याचे कळले त्यानुसार सदर महिलेस डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले व त्यानुसार दि 9 वार बुधवार रोजी रजनी हॉस्पिटलमध्ये त्या महिलेस दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यात ही गाठ जवळ जवळ ३ किलो वजनाची भरली.शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेस पोटात दुखणे हा त्रास कमी झाला.डॉ विनोद महाले यांनी शस्त्रक्रियेनंतर अश्या गाठी निर्माण होण्यामागे शरीरात होणारे हॉर्मोन्समधील बदल कारणीभूत असतात असे सांगितले.डॉ विनोद महाले यांनी आतापर्यंत अश्या किचकट व जोखमीच्या शस्त्रक्रिया करून शास्त्र किती प्रगत झाले आहे याची अनुभूती दिली.
Tags
news
