धुळे,
दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील
रक्तपेढीत विविध रक्तगटाच्या रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे.
त्यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे,
असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव,
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.
पल्लवी सापळे, रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक शेजवळ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी
श्री. यादव यांनी म्हटले आहे,
वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात
अनेक अस्तव्यस्त रुग्ण, अपघातातील
जखमी रुग्ण, थॅलेसीमिया,
सिकलसेल रुग्णांसह प्रसूतीसाठी महिला दाखल
होतात. मुंबई-
आग्रा, नागपूर- सुरत,
धुळे- सोलापूर या महामार्गांवर धुळे शहर आहे.
त्यामुळे अपघातील रुग्ण मोठ्या संख्येने दाखल
होतात. या पैकी काही रुग्णांवर
तातडीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. या शस्त्रक्रियांच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते.
सद्य:स्थितीत रक्तपेढील विविध रक्तगटाच्या पिशव्या अत्यंत कमी
संख्येने शिल्लक आहेत. धुळेकर
नागरिक दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदान करीत रुग्णांचे जीव
वाचविण्यासाठी पुढे येतात. आता ही
रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव,
अधिष्ठाता डॉ. सापळे, डॉ.
शेजवळ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी चंदूलाल साठे (94203-94118)
यांच्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
