असलोदला मोठा दारुसाठा जप्त कार्यवाही मात्र गुलदस्त्यातच उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह?





शहादा प्रतिनिधी कृष्णा कोळी 
 शहादा तालुक्यातील असलोद गावात काही दिवसांपूर्वी नुकतीच नंदुरबार उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकुन मोठ्या प्रमाणात अवैध दारु साठा जप्त करण्यात आला असल्याची चर्चा दिवसभर गावात सुरु होती त्याच दिवशी काही पंत्रकाराना उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्याची माहीती दिली असल्याची चर्चा झाली परंतु त्याच दिवशी सायंकाळ पर्यंत उत्पादन शुल्क विभागाने काय कारवाई केली याची मात्र दिवसभर चर्चा होत राहीली.सायकाळ पर्यत कोणत्याही उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी प्रेस नोट काढली नाही व सखोल माहीती देखील पत्रकाराना देण्यात आली नाही.त्या कारवाईची सर्व माहीती आज पर्यत उत्पादन शुल्क विभागाने आपल्या गुलदस्त्यातच ठेवल्याचे चित्र जनतेला व पत्रकाराना आता पर्यत दिसुन येत आहे.त्यामुळे उत्पादन शुल्क शहादा व नंदुरबार यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थीत होत असल्याची चर्चा असलोद परिसरात व पंत्रकारानमधे चागलीच रंगत असल्याचे दिसुन येत आहे.
ज्या दिवशी उत्पादन शुल्क विभागाने असलोदला अवैध दारुचा मोठा साठा जप्त झाला त्या दिवशी बऱ्याच पंत्रकारानी उत्पादन शुल्क विभागाकडुन माहीती  जाणुन घेण्याचा प्रयत्न केला पंरतु कोणतीही माहिती पंत्रकाराना देण्यात आली नाही.माहीती लपवत असल्याचा प्रकार त्या दिवशी जनतेच्या व पत्रकारांच्या निदर्शनास दिसुन येत होता.दुसऱ्या दिवशी मात्र काही वृत्तपंत्रात असलोदला मोठ्या प्रमाणात नंदुरबार उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुचा साठा जप्त केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याचे दीसुन आले.मात्र त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने जनतेला व पत्रकाराना आज पर्यत माहीती दिली नसल्याची बाब समोर येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजा बाबत आश्र्चर्य व्येक्त केले जात आहे.नंदुरबार येथील उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात अवैध दारुसाठा किती जप्त केला ? कोणा कोणावर ठोस कारवाई केली की नाही ? एवढे दिवस उलटुन देखील उत्पादन शुल्क विभाग का  या प्रकरणाचा खुलासा करित नाही ?असा मोठ्या प्रमाणात दारुसाठा किती ?असे एक ना अनेक प्रश्न असलोद गावकरी व पंत्रकार उपस्थीत करित आहे.या सर्व प्रश्नाची उत्तरे उत्पादन शुल्क विभागाने देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.ती माहीती जनते समोर येणे आवश्यक झाले आहे. उत्पादन शुल्क शहादा व नंदुरबार याच्या कामकाजावर जनता व पंत्रकार प्रश्न चिन्ह उपस्थीत करित आहे.जप्त केलेला मोठा अवैध दारुसाठा किती व कोणावर काय कारवाई झाली याचा खुलासा करुन उत्पादन शुल्क विभागाने आपल्या कामकाजामधे पारदर्शकता व सत्येता आणावी अशी जनतेची व पत्रकाराची अपेक्षा आहे.नंदुबार उत्पादन शुल्क विभागाने गुलदस्त्यात असलेली माहीती लवकर बाहेर काढावी अशी आता मागणी पंत्रकार व असलोद गावातील जनतेतुन होत आहे.गुप्त सुत्रांनुसार असलोदला बीयर शाॅपीत हा साठा आढळल्याची असलोद गावात दबक्या आवाजात गुप्तगु चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे ही माहिती खरी आहे की खोटी आहे हे आता उत्पादन शुल्क विभागाची गुलदस्त्यातली माहीती समोर आल्यावरच जनतेला कळेल.गुलदस्त्यातील माहीती उत्पादन शुल्क विभाग केव्हा पंत्रकाराना देतात याची आता जनता वाट पाहत आहे.एका बाजुस असलोद गावाची जनता दारुबंदीसाठी लढा देत आहे आणी दुसऱ्या बाजुस नंदुरबार व शहादा उत्पादन शुल्क विभागा कडुन असलोद येथील अवैध दारुसाठा जप्त केल्याची माहीती लपवत असल्याची बाब समोर येत असल्याने असलोद गावाला दारूबंदीसाठी न्याय कोण देईल असे जनहीतात प्रश्न आता उपस्थीत होत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने