प्रतिनिधी : पत्रकार उत्कर्ष समितीच्या नुकताच झालेल्या अंबरनाथ तालुक्याच्या व्हर्चुअल सभेमध्ये संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली अंबरनाथ तालुका अध्यक्ष म्हणून शैलेश सणस यांची निवड करण्यात आली.
सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातून कार्यरत असणारी पत्रकार उत्कर्ष समिती कमी अवधीतच संपूर्ण महाराष्ट्रात विकसित झाली आहे. क्रियशील असणाऱ्या समितीने महिलांनाही प्राधान्य देत महिला उत्कर्ष समितीची स्थापना केल्यानंतर दोन्हीही समितीची तितक्याच झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
शैलेश सणस यांची हुरहुन्नरी कामगीरी पाहून नुकताच अंबरनाथ येथे झालेल्या उत्कर्ष समितीच्या व्हर्चुअल सभेमध्ये संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली अंबरनाथ तालुका अध्यक्ष म्हणून शैलेश सणस यांची निवड करण्यात आली असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुढील कार्यास वाव देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले
Tags
news
