शिरपूर प्रतिनिधी - केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व शासनाच्या इतर विविध आवास योजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आज दिनांक 17 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यशाळा शिरपूर पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. ज्या प्रतिनिधींना या कार्यशाळेसाठी उपस्थित राहता आले नाही त्या सर्वांसाठी ऑनलाईन व्हिडिओ कॉम्प्रेसर ची लिंक पाठवण्यात आले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामीण विकास विभागाने प्रत्येक तालुक्यात तालुक्याचे आमदार यांच्या अध्यक्षतेखाली सदरची कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली सदरची कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना ,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावीपणे अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती व्हावी या उद्देशाने दिनांक 20 नोव्हेंबर 2012 रोजी राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून राज्यात ग्रामीण सुरू करण्यात आले आहे त्याअनुषंगाने अभियान ग्रामीण अंतर्गत शिरपूर तालुकास्तरीय कार्यशाळा आमदार काशीराम पावरा ह्यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पंचायत समिती शिरपूर ,उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी ,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ,बँक प्रतिनिधी ,पत्रकार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शिरपूर सभागृहात संपन्न झाली या वेळेत शासन निर्णयातील परिशिष्ट अ मधील पुरस्कार निवडीचे निकष व परिशिष्ट ब मधील सर्वोत्कृष्ट घरकुल योजनेचे निकष बाबत माहिती सदर कार्यशाळेत देण्यात आली. तसेच शंभर दिवसांचे महा आवास अभियान ग्रामीण कालावधीत पूर्ण करावा याबाबत माहिती देण्यात आली .आवास योजनेअंतर्गत शासनात शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करून शंभर दिवसांचे महा आवास अभियान अंतर्गत 100 टक्के काम पूर्ण करून आवास योजना राबवावी असे याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले .सदर कार्यक्रमात गटविकास अधिकारी वाय डी शिंदे यांनी हे अभियान पूर्ण करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
Tags
news
