केंद्र सरकारच्या कृषी कायदे व विविध धोरणाचा विरोध
मोदी शहावर हल्ला बोल,आका आणि बोका चे कायदे व्यापारी हिताचे व शेतकरी विरोधी आल्याचा आरोप
शिरपूर प्रतिनिधी- केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनादरम्यान 30 शेतकऱ्यांच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मृत्यूदेखील झाला आहे. तरीदेखील केंद्रातील मोदी सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मंजूर केलेल्या नाहीत .म्हणून महाराष्ट्रातून हजारो शेतकरी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून निघाले असून त्याचा मुक्काम दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी शिरपूर शहरात होता .त्या मुळे तालुका किसान संघर्ष समन्वय समिती व सर्व समविचारी पक्ष यांच्या वतीने शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. व पाच कंदील चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या जाहिर सभेत माजी आमदार जे पी गावित, किसान सभेचे किसन गुजर ,डॉक्टर अजित नवले ,कॉम्रेड राजू देसले ,किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक धवळे,किसन गुजर, डी एल कराड, अजित नवले,सुकाणू समिती सचिव, राज्य सह सचीव सुनील मालुसरे,
अर्जुन आडे, आमदार विनोद निकोले, पालघर, डहाणू, शिरपूर तालुका काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अभिमान भोई ,तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, शहराध्यक्ष उत्तमराव माळी ,शेतकरी विकास फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष मोहन पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश करनकाळ, डॉ.मनोज महाजन ,,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत सिंह राजपूत ,शहर प्रमुख मनोज धनगर ,भाकपचे तालुका सेक्रेटरी एड. संतोष पाटील एड. मदन परदेशी एड. सचिन थोरात, किसान सभा जिल्हाध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी ,तालुका अध्यक्ष किशोर सूर्यवंशी ,अर्जुन कोळी, जितेंद्र देवरे संघटनेचे , सत्यशोधक जनआंदोलनाचे कचरू अहिरे, दत्तू थोरात , तालुका किसान संघर्ष समन्वय समिती चे सदस्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
या सभेतून केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्यामुळे भविष्यात शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे ,शेतकरी ,शेतमजूर ,कष्टकरी गोरगरिबांवर छोट्या व्यापाऱ्यांनाही या कायद्याची जरब बसणार असून भांडवलदारांचे या कायद्यामुळे भले होणार आहे असे आरोप लावण्यात आले. वक्त्यांनी कृषी कायदे, वीज बिल विधेयकाला विरोध केला असून, मोदी सरकारने कामगारांचे 29 कायदे मोडीत काढून भांडवल दारांचे भले केले आहे,केंद्रातील आका व बोका चे सरकार अंबानी अडाणी चे भले करत असून पूर्व नियोजित प्लॅन नुसार धान्य साठवण्याचे गोदाम तयार होत आहे,
शेतकरी ना हमी भाव नाही, मालाची रक्कम बाबत कायदे नाही,मोदी हे कॉरिपोरेट चे गुलाम असून त्यांनी जनतेला खोटे आश्वासन दिले आहेत 15 लाख चे काय झाले? काळा पैसा आला का ? पेट्रोल डीझेल दर वाढ कमी का होत नाही असे अनेक गंभीर आरोप या वेळी वक्ते यांनी केले. त्याच बरोबर ज्यांना शेती समजत नाही अश्या व्हाट्सउप विरं यांच्यावर देखिल टीका केली व गोदी भक्त व गोदी मीडिया यावर कडाडून टीका केली.
प्रस्ताविक व आभार प्रदर्शन ऍड हिरालाल परदेशी यांनी केले.
Tags
news
