शिरपूर-किसान विद्या प्रसारक संस्था संचलीत डॉ व्ही व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे शासनाच्या निर्देशानुसार व मुख्याधिकारी शि व न पा यांच्या क्षेत्रीययंत्रणेचा पडताळणीनुसार सोमवार, दि.14 डिसेंबर रोजी इ. ९वी ते १२वी चे वर्ग सुरु करण्यात आले.
सर्व शासकीय सूचनांचे पालन करीत विद्यार्थी शारीरिक अंतर राखत मास्क लावून पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलसह विद्यालयात आले.या प्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार ताईसाहेब आशाताई रंधे यांनी विदयार्थी प्रतिनिधी चे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.श्री प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शनानुसार प्राचार्या कामिनी पाटील यांच्या नियोजनाने विद्यार्थ्यांची तपासणी करुन स्वागत करुन वर्गांमध्ये प्रवेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे तापमान, पल्स व आॅक्सिजन पातळी तपासून त्याची नोंद घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करुन मार्गदर्शक सूचना देवून शारीरिक अंतर राखत निर्जंतुकीकरण केलेल्या वर्गांमध्ये त्यांना बसविण्यात आले. विशेष बेंचवर विघ्यार्थ्यांचे नावाची चिट लावली गेली. तसेच वर्गात व मैदानावर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली गेली.उपशिक्षक प्रकाश बारी, विशाल सोनगडे ,रिदवाना शेख,सुरेखा चौधरी, शगुफ्ता पिंजारी,छाया पाटील,वंदना पांडे, पूजा बाफना, ज्योती पवार,ममता शितल चव्हाण ,प्रशांत बोरसे उपस्थित होते ,समाधान राजपूत ,सरला वाघ,निलेश बडगुजर रेखा शिरसाठ यांनी विशेष सहकार्य केले.
Tags
news
