एनएसई फाऊंडेशन,सिनी ,टाटा ट्रस्ट आणि जिल्हा आरोग्य विभाग नंदूरबार च्या वतीने शहादा तालुक्यातील मडकानी गावात वयोवृध्द यांचा आरोग्यासाठी ऍक्टिव्हिटी सेंटर सवंगडी " वेगळ्या वळणावरचे " उदघाटन





*कृष्णा कोळी शहादा मो..9823983435 प्रतिनिधी*: 
मडकानी =सद्यस्थितीत कोरोनो चा प्रादुर्भाव हा दिवसें-दिवस वाढत असून देशाची आरोग्याची परिस्तिथी ही काळजीजनक आहे आहे यात कोरोनाचा सर्वात जास्त धोका हा  वयोवृद्ध लोकांना सार्वंधिक आहे.वयोवृद्ध लोकांना  शुगर,रक्तदाब, दमा ,याची व्याधी असल्याने व रोग प्रतिकारशक्ती ची कमतरता असल्यामुळे ते कोरोनो ला बळी पडता म्हणून कोरोनाचा मृत्यूदरा मध्ये जास्तीत जास्त वयोवृध्द यांचे प्रमाण आहे.
वयोवृध्द यांची आरोग्याची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार चा राष्ट्रिय वृद्धापकाळ आरोग्य सुश्रुषा  कार्यक्रम हा 2011 पासून सुरू झाला आहे. एनएसई फाऊंडेशन,सिनी आणि टाटा ट्रस्ट आणि जिल्हा आरोग्य विभाग नंदुरबार च्या वतीने शहादा तालुक्यातील 80 गावामध्ये हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू आहे.  याचाच एक भाग म्हणून ऍक्टिव्हिटी सेंटर ची निवड करून ग्रामीण व दुर्गम भागातील व्यववृद्धांचा आरोग्यासाठी सदर ऍक्टिव्हिटी सेंटर सुरू करण्यात आले आहे यामुळे वयोवृद्ध यांना आरोग्य शिक्षण, होम  बेस केयर मार्गरदर्शन,आहार मार्गरदर्शन, शारीरिक व्यायाम  यावर दरोरोज मार्गरदर्शन देण्यात येणार आहे. 
यासाठी  एनएसई  फाउंडेशन सिनी,टाटा ट्रस्ट, च्या वतीने ऍक्टिव्हिटी सेंटर साठी व्यायामाचे साहित्य, देखील उपलब्ध करून दिले  आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ सुमीत देवरे यांनी ऍक्टिव्हिटी सेंटरबद्दल माहिती दिली यात ऍक्टिव्हिटी सेंटर चे महत्वचा उद्देश म्हणजे गावातील वयोवृद्ध  यांना एकत्र येऊन आपल्या आरोग्यासाठी सामूहिक पद्धतीने व्यायाम करणे ,यातून त्याना एकमेकांना भेटायला होईल, एकमेकांचे विचाराची देवानं घेवाण होऊन मानसिक संतुलित चांगले राहील तसेच यात BP, शुगर, संधीसाधू आजार,संतुलित आहार या विविध विषयांवर दररोज सेंटर  मध्ये एक तासाचा कार्यक्रम सुरू राहील यातूनच वयोवृद्ध याची आरोग्यासाठी काळजी घेतली जाईल तसेच यातूनच एकदिवसीय दवाखाना बाबत माहिती नियमितपणे देऊन त्याचे पुढील नियोजन करून लवकरच वयोवृध्द यांचा साठी जेरेटिक दवाखाना सुरू करण्यात येणार आहे असे सांगितले.
      याप्रसंगी  कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मणीलाल शेलटे,पं. स.सदस्य डॉ.जाधव ठाकरे, ग्रामविकास अधिकारी कन्हैया टी सर,सरपंच प्रल्हाद पवार,पोलीस पाटील उदयसिंग भिलावे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल पवार,उपसरपंच एकनाथ धानाक,दामू ठाकरे सिनी चे  डॉ. सुमीत देवरे  तसेच  गावातील वयोवृध्द उपस्थित होते.तरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर ठाकरे यांनी केले तर आभार किशोर जाधव यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने