डॉक्टर शर्वरी कढरे यांचे सुयश....




 शिरपूर - डॉक्टर शर्वरी विजय कढरे यांनी नुकतेच एम.जी.एम दंत चिकित्सक कॉलेज पनवेल मुंबई येथून दंत चिकित्सक पदवी  संपादन केली. डॉक्टर शर्वरी कढरे यांचे वडील विजय डोंगरे कढरे हे  आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे गेल्या पंचवीस वर्षापासून उपशिक्षक पदावर कार्यरत असून डॉक्टर शर्वरी यांच्या आई सौ. सुनंदा कढरे ह्या  प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल , शिरपूर नगरीचे नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन पटेल,आर. सी. पटेल संकुलाचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, सचिव प्रभाकररावजी चव्हाण, संस्थेचे सी.ई.ओ. डॉक्टर उमेशजी शर्मा, तसेच चोपडा येथील प्रताप विद्या मंदिर या संस्थेचे संस्था अध्यक्ष विठ्ठलदास छगनलाल गुजराथी , सचिव माधुरीताई मयूर, चेअरमन  राजाभाई मयूर यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिरपूर  व चोपडा  तालुक्यातील सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले  व शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने