सर्वपक्षीय किसान संघर्ष समन्वय समिती चे उद्या दि.8 रोजी शिरपूर बंद चे आवाहन किसान बचाव, देश बचाव, दिल्ली च्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा





शिरपूर - शिरपूर च्या सर्वपक्षीय किसान संघर्ष समन्वय समिती चे उद्या दि.8 रोजी शिरपूर बंद चे आवाहन केले असून किसान बचाव, देश बचाव,चा नारा देत दिल्ली च्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी केंद्र शासनाने एकतर्फी पारित केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी व नवी दिल्ली येथे या मागण्यांसाठी भर थंडीत संघर्ष करणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी  8 डिसेंबर रोजी मंगळवारी सर्वपक्षीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे शिरपूर बंद चे आवाहन करण्यात आले आहे. जीवनावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन व्यापारी बांधवांना करण्यात आले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी  8 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता  विजय स्थंम्ब पाच कंदील चौकात एकत्र यावे,  व तेथून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पायी जाऊन निवेदन देण्यात येणार आहे तरी शेतकरी हितात सर्वपक्षीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी एकत्र यावे व सोशल डिस्टनसिंग व मास्क व सॅनिटीझर चा वापर करून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून या बाबत ची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने