शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात 34 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रंगात असताना व दावे-प्रतिदावे व राजकीय आखाडा जोमात सुरू असताना तालुक्यातील घोडसगाव या गावाने एक नवीन इतिहास रचला असून घोडसगाव ग्रामपंचायत तब्बल 55 वर्षा पासून सतत बिनविरोध झाली आहे. यासाठी आ.अमरिश भाई पटेल यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले असून गावातील सर्व नागरिकांचे व राजकीय पदाधिकाऱ्यांचे सहकार्य व सामंजस्य लाभल्याने ग्रामपंचायत बिनविरोध होणे शक्य झाले आहे .यापूर्वी 1965 ते 1978 या कालावधीत नारायण व्यंकट गुजर यांनी सरपंचपद भूषविले होते, 1978 ते 1995 या कालावधीत प्रकाश भोमा गुजर यांनी 3 वेळा सरपंचपद भूषविले असून एक वेळा या पंचायतीवर प्रशासक त्यांची नेमणूक झाली होती .यानंतर 1995 ते 2000 या काळात भागवत तुंबडू गुजर यांनी सरपंचपद भूषविले तर 2000 ते 2005 या काळात हुकुमचंद धोंडू गुजर यांनी सरपंच पद भूषवले, 2005 ते 2010 या काळात सौ निर्मला प्रकाश गुजर यांनी सरपंचपद भूषवले तर 2010 ते 2015 या कालावधीत समाधान देवीसिंग ठाकरे यांनी सरपंच पद भूषवले आहे .2015 ते 2020 या काळात अडीच अडीच वर्ष सुकलाल महादू गुजर व सुधाकर झुंबरलाल गुजर यांनी सरपंच पद भूषवले आहे. 2020 च्या या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा गावकऱ्यांनी गावातील निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला असून 2020 ते 2025 या कालावधीत सरपंच पदाची जागा उषाबाई हुकुमचंद गुजर यांना देण्याचा निर्णय सर्व मताने झाला असून सरपंच आरक्षण सोडत झाल्यानंतर पुढील अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे दरम्यान तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक नवा आदर्श निर्माण करत घोडसगाव या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा बहुमान पून्हा पटकावला आहे.
Tags
news
