निरोप....2020....
तू निघालास.... जा ....
जाणाऱ्या पाहूण्याला ही आनंदाने निरोप देणारी आमची संस्कृती
पण....
तूझ्याबाबतीत नेमकं कस व्यक्तं व्हाव हेच समजेनास झालयं.
नेहमीच्या पेक्षा जल्लोषात तूझं स्वागत केल होत.
कारण इतर वर्षां पेक्षा एक दिवस जास्तीचा घेवून आला होतास.
वाटलं होतं इतर वर्षांपेक्षा काही वेगळे रंग भरशीलं सर्वांच्याच जगण्यात.
पण....
रंग भरण्या ऐवजी, असे रंग दाखवलेस, कि जगणचं असह्य केलस सर्वांच...
माणसांनाच माणसा पासून तोडलसं!
प्रत्येकाच्या कुणा ना कुणा जिवलगांना अगदी वयाचं अंतर न पाहता अल्लदं त्यांच्या पासून दूर नेलसं कधीही न परतण्याच्या बोलीवर ......
अगदी त्यांची शेवटची भेटही घेवू दिली नाहीस कुणाला.
ज्यांच्या घरातील माणसं गेली. ती तर मनानं पार खचून गेली.
प्रत्येकाच्या डोळ्यात भिती चेहऱ्यावर चिंता आणि प्रत्येकाच काळीज आक्रंदत राहिलं.
रात्रंदिवस टांगती तलवार ठेवलीस प्रत्येकाच्या डोक्यावर ....
काहींनी घाबरुन जिवन संपवल.
तर काही भुकेने गेले.
घरी जाण्यासाठी निघालेल्या काहिंना सरळं देवाघरी नेलेस!!!
संपूर्ण मानव जातीला चारभिंतीत कैद करून तू विध्वंसक थैमान घातलस.
आणि सोबतं निसर्गाला ही बोलावलस???
त्याने तर कैक पिढ्या माणसाने त्याच्यावर केलेल्या अत्याचाराचा सुडच उगवला.
त्यात आमचा शेतकरी भरडला, राबराब राबून पिकवलेलं शेत आणि कष्ट करून उभारलेलं घर डोळ्यासमोर वाहून गेलेलं पहाताना, काळीज फुटेस्तोवर उरबडवून रडला....
आबालवृध्दांची जगण्याची इच्छाच मारलीस.
बालकांच्या आयुष्यातीलं आनंदाच एक वर्ष तू हिरावून घेतलसं.
भयाचे,वाईटाचे, वेदनेचे अवघड डोंगर रचून ठेवलेस.
या सगळ्या वाईटात काही चांगल्या गोष्टी शिकवल्यास.
निसर्गाला काही काळ का होईना मोकळा श्वास घ्यायला दिलास.
माणसाला, जगण्याचं भान दिलस.
माणसा सोबत माणसाला माणसा सारखं वागायला भाग पाडलस.
गरिब,श्रीमंत,उच्च निच अमंगळ भेद विसरायला लावलेस.
एका एका श्वासाची किंमत दाखवून दिलीस.
कुटुंबात सुसंवाद घडवलास.
कमीत कमी साधनात जगता येत, याची पुन्हा आठवणं करुन दिलीस...
छोटे छोटे अनेक बदलं घडवलेस तरीही.....
तूझा दु:खाचा तराजू जडच होता.
म्हणूनच...
तू निघतोयस तर मी तुला एवढचं म्हणेन...
*SORRY 2020........... माफ कर पुन्हा असा येऊ नकोस ..... SORRY
