पुणे, ता : पुरुष हक्क संरक्षण समितीचे 23 वे राष्ट्रीय अधिवेशन ता : 12 व 13 डिसेम्बरला पंढरपूर येथे आयोजित केले आहे.त्यामध्ये कायद्याचा होणारा गैरवापर रोखणे व उध्वस्थ होणारी कुटुंबसंस्था वाचविण्यासाठी कौटुम्बिक कायद्यात सुधारणा करण्याविषयी समितीचे राज्यातील कार्यकर्ते, वकील मसुदा तयार करणार आहेत. भारतातील पहीली नोंदणीकृत अशी पुरुष हक्क समिती सन 1996 पासून अन्यायकारक कौटुम्बिक कायद्यात बदल करण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देत आहे.समितीच्या कार्यात महिलांचाही सहभाग सुरवातीपासून आहे. शनिवार ता: 12 रोजी पद्मशाली धर्मशाळा, गोविंदपूरा येथे सायं 6 वा अधिवेशनाचे उद्घाटन पंढरपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.भगवान मुळे यांच्या हस्ते होईल. रविवार ता : 13 ला सकाळी 10 पासून विविध कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. समितीची यापूर्वी पुणे, नाशिक, मुम्बई, सांगली, रत्नागिरी, नागपूर, ठाणे, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, लातूर आदी ठिकाणी अधिवेशने झाली. भा दं वि कलम-498 ए मध्ये समितीच्या आंदोलनामुळे बदल झाले आहेत. याशिवाय कौटुम्बिक हिंसाचार प्रतिबंध कायदासह कलम- 354, 376, 494, 497 ,125 CRPC य़ा कलमांत बदल करण्यासाठी समितीचे कार्य सुरू आहे. अधिवेशनात कायद्याविषयी चर्चासत्रे होणार असून महिलांसाठी विशेष चर्चासत्र असून यावेळी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. पुरूष आयोग त्वरित गठित व्हावा याकरिता समितीचे कार्य देशातील विविध राज्यात तसेच महाराष्ट्रात मोफत कायदेविषयक सल्ला, सहाय्य देण्याचे कार्य समिती करत आहे. यासाठी अँड.संतोष शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष- सेव्ह इंडियन इनोसंट फेमिली, झार्खण्ड. राष्ट्रीय प्रवक्ता- पुरुष आयोग समन्वय समिती, दिल्ली, राष्ट्रीय सहसचिव- मेन्स राईट्स फाउंडेशन वेलफेर सोसा, भोपाळ. प्रदेश अध्यक्ष- आवाज फाउंडेशन ट्रस्ट, पंजाब, कार्यकर्ता पुरुष हक्क संरक्षण समिती, पुणे हे भारतभर फिरून जनजागृती करीत आहेत. अधिवेशनाचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.सुनिल घाडगे, सचिव-अँड धर्मेंद्र चव्हाण, अँड संतोष शिंदे, अँड बाळासाहेब पाटील, अँड. नितीन बडूले, श्री. प्रसाद ननावरे अँड शैलजा केळकर , सौ.संगीता ननावरे, सौ.तेजस्विनी मरोड, श्री. दत्तात्रय परळकर, श्री.प्रसाद पंचपोर, श्री.ललित ठाकूर, श्री. दिनेश देशमुख आदींनी केले आहे. अधिवेशनात कायदेविषयक सहाय्य व सल्ला देण्यात येणार आहे.याचा फायदा करुन घेण्याचे आवाहन अँड. संतोष शिंदे, पुणे यांनी केले असून अधिक माहितीसाठी मोबा नं- 7507004606 वर सम्पर्क साधावा.
Tags
news
