शिरपूर : आजकाल प्रामाणिकपणा क्वचितच बघायला मिळतो, शिरपुर येथील भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, फर्निचर मिस्तरी बापु लोहार यांना शहरातील क्रांती नगरमधील पाणी फिल्टर जवळ ७००० हजार रुपये किंमतीचा j1 Samsama कंपनीचा मोबाईल दि. २ नोव्हें रोजी रात्री ८ वाजेला सापडला. तो मोबाईल प्रशांत सुभाष गुजर शिक्षक सौ. सावित्रीताई रंधे कन्या माध्यामिक विद्यालय शिरपूर रा. वाडी॥ ता. शिरपूर. जि. धुळे यांचा असल्याचा समजल्यावर व खात्री पटल्यावर त्यांनी लगेच दि. ३ नोव्हें रोजी सकाळी १० वाजेला भाजपा धुळे मा.जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जनकल्याण पतसंस्था माजी चेअरमन किशोर ठाकरे, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष अनिल गुजर आदिंचा प्रमुख उपस्थितीत प्रशांत सुभाष गुजर यांच्याकडे मोबाईल सुपूर्द केला त्याबद्दल प्रशांत गुजर यांनी आपल्याही मनाचा मोठेपणा दाखवत ५०० रु बक्षीस स्वरूपात त्यांना दिलेत.
Tags
news