आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे पर्सीटंट कंपनीत निवड, मिळणार वार्षिक ४.४१ लाख वेतनश्रेणी




शिरपूर : दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांची पर्सीटंट सिस्टम्स प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक ४.४१ लाख वेतश्रेनीवर ट्रेनी सॉफ्टअर  इंजिनियर पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.





नुकतेच पर्सीटंट सिस्टम्स प्रा.ली. कंपनीतर्फे आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी विषेश कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातून केवळ आर. सी. पटेल अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांना पर्सीटंटच्या निवड प्रक्रियेला सामोरे जाण्याची संधी प्राप्त झाली होती. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या संगणक शाखेचे विद्यार्थी ज्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी ६० टक्के गुण आहेत असे विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते. तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत व शेवटी एच. आर. राउंड झाला, त्यात अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेच्या जयदीप दौलत नेरे व योगेश हेमराज पाटील या विद्यार्थ्यांची वार्षिक ४.४१ लाख वेतश्रेनीवर ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर निवड झाली. मुलाखत प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन व प्रा. सचीन परदेशी यांनी परिश्रम घेतले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

जागतिक स्तरावरील कंपन्या तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आस्थापनांना सॉफ्टवेअर संबंधित सेवा पुरविणाऱ्या पर्सीटंट सिस्टम्स प्रा. लि. सुरुवातीपासूनच आयएसव्हीला मूल्य वितरीत करीत आहे आणि त्यांची उत्पादने नवीन बनविण्यास, डिझाइन करण्यात आणि विकसित करण्यात मदत करीत आहेत. कंपन्यांची डिजिटल प्रतिमा निर्माण करण्यासाठी व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी कंपनी ४.० सॉफ्टवेअरचा वापर करते ज्यामध्ये लोक, प्रक्रिया, साधने आणि डेटा समाविष्ट आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने