युवकमित्र परिवारातर्फ अक्कलकुवा तालुक्यात पोषण आहार व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न....




पुणे येथील नगरसेवीका माधुरी सहस्त्रबुद्धे यांची कुपोषणमुक्तीसाठी मदत-

-नेहरू युवा केंद्र नंदूरबार संलग्न 'युवकमित्र परिवार नंदूरबार' यांच्यातर्फ अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर, चापडी,केवडी गावातील १०० कुपोषीत बालकांना पोषण आहार जनजागृती,पोषण आहार व मिठाई वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.कुकडीपादर ग्रा.प.कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा येथील प्रा.ज्ञानी कुलकर्णी,उदघाटक म्हणून कुकडीपादर ग्रुप ग्रा.प.चे सरपंच फत्तेसिंग वसावे,तळोदा येथील डॉ.उत्कर्ष राणे,युवकमित्रचे संस्थापक प्रवीण महाजन,ग्रामसेवक रत्नाकर शेंडे,मोलगी येथील प्रा.रवींद्र वानखेडे, अशोक वरठा यांच्यासह अंगणवाडी सेविका,बालक व त्यांच्या माता उपस्थित होते.
     यावेळी तळोदा येथील कै. प्रा.अशोक राणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त डॉ.उत्कर्ष राणे यांनी दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप केले.मोलगी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र वानखेडे यांनी प्रास्तविक केले.तर प्रवीण महाजन यांनी पोषण माह व पोषण आहाराचे महत्व विषद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी उपस्थित महिला व बालकांना सकस आहार व सदृढ बालक यांचे महत्व पटवून दिले.सरपंच फत्तेसिंग वसावे यांनी आभार मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस पाटील  श्यामसिंग वसावे,अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने