रुग्ण व पदाधिकारी यांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार काशीराम पावरा यांनी दिली सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट




शिरपूर : जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, रूग्ण यांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार काशीराम पावरा यांनी सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच तातडीने रुग्णांना सोयी सुविधा पुरविण्यासह कोणीही आरोग्य सेवा पुरविण्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी सांगवी ता. शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील सर्व सुविधांची पाहणी करून रुग्णांच्या समस्यांविषयी संपूर्ण माहिती घेतली. यावेळी येथील जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी काही दिवसांपासून सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याबाबत लक्षात आणून दिले. तसेच येथील अनेक सुविधांकडे वैद्यकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या. या सर्व बाबींची दखल घेऊन आमदार काशीराम पावरा यांनी तातडीने सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथील डॉक्टर यांची कानउघडणी करून रुग्णांना तातडीने सुविधा पुरविण्याबाबत आदेश दिले. तसेच तेथूनच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्र कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले. यावेळी शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनीही लगेच भेट देऊन आमदार काशीराम पावरा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हे देखील सांगवी येथे येऊन पदाधिकाऱ्यांशी रुग्णांची चर्चा करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

यावेळी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, पंचायत समिती सदस्य प्रभाबाई कोकणी, सांगवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राणा पावरा, गुलाब धानका, शिकाऱ्या पवरा, मुरलीधर देशमुख, रुपला पावरा, राजेश पावरा, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र हे शिरपूर तालुक्यात फार सुरुवातीपासून चांगल्या आरोग्य सुविधा देण्याबाबत प्रसिद्ध असून गेल्या काही महिन्यांपासून मात्र येथे रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळाव्या, महिलांच्या डिलिव्हरी बाबत योग्य ती काळजी घेणे, त्यांना सकस आहार पुरविणे, शौचालयाची दुरावस्था तसेच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जीर्ण झालेली निवासस्थाने, पाण्यासाठी बोअरवेलची व्यवस्था असून देखील येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या नियोजनाअभावी पुरेशी पाण्याची व्यवस्था नसणे अशा अनेक तक्रारी पदाधिकारी व रुग्णांनी केल्या. या सर्व बाबींची दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत आमदार काशीराम पावरा यांनी सूचना दिल्या. तसेच वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत आश्वासन दिले, त्यानंतर लगेचच पाठपुरावा सुरू केला.

जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनीही संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना योग्य ती काळजी घेऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल यांनी येथील कर्मचाऱ्यांचे जीर्ण झालेले निवासस्थाने बाबत पत्रव्यवहार केला आहे. तसेच येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्यसेवा पुरविण्याकडे पुरेसे लक्ष देण्याबाबत देखील वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने