डोंबिवली-नागालॅन्डचे विद्यार्थी डोंबिवली येथील वनवासी कल्याण आश्रम(पुर्वांचल प्रकल्प)येथे शिक्षण घेत आहेत. त्यांची दीवाळी गोड जावी या उद्देशाने जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्यावतीने मास्क व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. आश्रमातील विद्यार्थ्यांना दीवाळीचे महत्व पटवून देण्यात आले.तसेच आश्रमातील व्यवस्थापक झिलाका यांनी विद्यार्थी कशा प्रकारे अभ्यास करतात,नागालॅन्डची संस्कृती, रहाणीमान,तेथील वातावरण यासंदर्भात उपस्थित मान्यवरांना माहीती करुन दीली.याप्रसंगी जनजागृती सेवा समितीच्या सचिव सौ.संचिता भंडारी, खजिनदार दत्ता कडुलकर, सहखजिनदार सौ.श्रुती उरणकर, कार्यकारिणी सदस्या सौ.मिनल गावडे, सौ.ममता तावडे,अश्विनी मुजुमदार,आशा कदम,तन्मई उरणकर, सविता ठाकुर ग्लोबल मालवणीचे सदस्य अभिषेक मुणगेकर यांच्या हस्ते मास्क व दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. अशोक म्हात्रे, सचिव डाॅ.वैभव पाटील,नवी मुंबई अध्यक्ष लालचन यादव,पत्रकार उत्कर्ष समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, महाराष्ट्र रोशनी न्यूजचे उप संपादक शैलेश सणस हे उपस्थित होते.प्रमुख पाहूण्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी श्रुती उरणकर,मिनल गावडे, सिंधुताई वायचळ यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थितांचे स्वागत, आभार व प्रास्ताविक जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले.
Tags
news
