बार्टीच्या वतीने " विद्यार्थी दिन " मोठ्या उत्साहात संपन्न.




नाशिक-शांताराम दुनबळे. 
  नाशिक-:   डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संवस्था ( बार्टी ) पुणे यांच्या वतीने आज विद्यार्थी दिनाचा ऑनलाईन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून हा कार्यक्रम ऑनलाईन मार्गदर्शन देऊन घेण्यात आला. बार्टीच्या वतीने समतादूतांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीम. माधुरी पाटील मॅडम ( जि. प. शिक्षिका मोडाळे, इगतपुरी ) या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुनील आहेर सर ( शिक्षक समुपदेशक ) हे होते.

     आहेर सरांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप उत्कृष्ट असे माहिती पुर्वक सखोल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण विषयीची तळमळ आणि जिद्द याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनातील खडतर प्रवासाबाबत देखील माहिती उदाहरणे देऊन अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले. ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसून शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती आज त्याने इतिहास घडवला. स्वतः च्या मेहनतीने जिद्दीने इतका मान - सन्मान मिळवला की त्याच्या शाळा प्रवेशाच्या दिवसाला 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. अशीच जिद्द आणि हिम्मत प्रत्येकाने बाळगावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले. कार्यक्रमाच्या अधक्ष्या पाटील मॅडम यांनी आपल्या अधक्षिय भाषणात सावित्रीबाई फुले याची ओवी गाऊन महापुरुषांना वंदन केले. तसेच बाबासाहेबांच्या बद्दल बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या बालपणाची माहिती दिली की कसे त्यांना घरातून त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व समजावले आणि बाबासाहेबाना स्वतः वाचनाची किती आवड होती. दोघांनीही बार्टीच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
             यावेळी समतादूत विशाल पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन केले. यावेळी विशाल पाटील यांनी रामजी बाबांनी लहान भिवाच्या शाळेतील पहिल्या दिवसाचा प्रसंग सांगून त्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रतिज्ञा दाभाडे आणि समतादूत श्रीमती रुपाली आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर समतादूत श्रीमती सविता उबाळे यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समतादूत उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने