*जिल्हा परिषदेच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचारी जर आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या पगाराच्या तीस टक्के रक्कम ही आई-वडिलांच्या खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असा ठराव सर्वसंमतीने संमत*
लातूर प्रतिनिधी --- राहुल शिवणे
लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि.10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, प्रणव मुखर्जी, अरुणाताई कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लातूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास साडेबारा हजार कर्मचारी कार्यरत असून एकूण 14 विभाग आहेत. या सर्व विभागांतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी हे जर आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या एकूण पगाराच्या 30 % रक्कम ही संबंधितांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी असा ठराव आजच्या सर्वसाधारण सभेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला. मंचकराव पाटील यानी ठराव माण्डला तर रामचंद्र तिरुके यानी अनुमोदन दीले आनी जीलहा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी मंज़ूर केला
समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम,सामान्य प्रशासन आदींसह विविध विभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष मा. राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, बांधकाम सभापती संगीताताई घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख, सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
Tags
news
