वरवाडे येथे पाच दिवसीय श्री. हनुमंत प्राणप्रतिष्ठा महोत्सव सोहळा संपन्न


शिरपूर : वरवाडे येथे श्री. संत सावता माळी चौक येथे दि. २५ नोव्हे. ते २९ नोव्हे.२०२० या कालावधीत श्री. हनुमान मंदिराचा जिर्णोदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दि.२५ नोव्हे. रोजी प्रायश्चित संकल्प दशरस स्नान व भव्य कलश यात्रा श्री. म्हाळसामाता मंदिरापासुन वरवाडे येथून काढण्यात आली. या प्रसंगी प्रतिष्ठाचार्य श्रध्देय महेंद्र कृष्ण शास्री यांनी मंत्रोच्चाराने अग्नी प्रवेश व पीठ स्थापन केले व पाच दिवसीय सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. दि. २८ नोव्हे. रोजी हनुमंत भगवानांची भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. या प्रसंगी शिरपूर-वरवाडे भाविक ग्रामस्थांनी जय श्रीरामाचा जल्लोष करत नाचत नाचत गात मिरवणुकीत उत्साह भरला.
या वेळी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सदर प्रसंगी वरवाडे परिसरात दारोदारी रांगोळी व गुढी उभारण्यात आल्या. तसेच श्री. संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे यांनी पाच दिवस रोज रात्री धार्मिक वातावरणात भजनांचा कार्यक्रम केला. या भजनाला दहिवद, वाघाडी, अर्थे, शिंगावे, उंटावद, बाळदे, साकवद, ताजपुरी, जातोडे, बोरगाव, जैतपूर, काकर्दे, कळंबू, सुरत, शिरपूर श्री.खंडेराव मंदिर, श्रीराम मंदिर, श्री.साईबाबा मंदिर, श्री.दत्त मंदिर, श्री.संत सावता माळी भजनी मंडळ शिरपूर, वाल्मिक नगर, हरिपाठ महिला मंडळ वरवाडे या  सर्व भजनी मंडळांनी अभंग, भावगीत, गवळणांचा भजनात आनंद घेतला. गावात जनु काही पुन्हा दिवाळी  साजरा करण्यात येत होती. सदर कार्यक्रमात ११ जोडप्याच्या हस्ते होमपुजन व जलाभिषेक, जलाधीवास, अन्नाधीवास, फलाहीवास शेवटी अभ्यंग स्नान करण्यात आले. दि. २९/११/२०२० रोजी संकल्पपुर्ती करुन मुर्तीची प्राण प्रतिष्ठा व कलश, ध्वजस्थापना करण्यात आली. ५६ भोग नैवद्य देऊन महाआरती करण्यात आली. भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी गावातील नगरसेवक, नगरसेविका, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सर्व तरुण मित्रमंडळ व गावातील सर्व भाविकांनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने