बिहार मधील यशाचा शिरपूर भाजपातर्फे आनंदोत्सव




शिरपूर : आजचा बिहार निकाल भारतीय जनता पार्टीच्या विश्वासाचे प्रतीक आहे. लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात सुरु असलेली विकासाची घोडदौड पुन्हा एकदा बिहारच्या जनतेने अंगिकारली आहे. प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले कष्ट, परिश्रम आणि केलेले नियोजन यामुळे बिहारला बहार आला आहे. त्यांचे कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. भाजपा राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडेंनी ही बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली. आजच्या बिहारच्या यशाबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे आ. काशिराम पावरा यांनी सांगितले. बिहार विधानसभा निवडणुकी सोबत ११ राज्यांमधील विधानसभांच्या ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकी मध्येही ४० जागा जिंकुन भाजपाने वर्चस्व कायम राखले असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे पं. बंगाल मध्ये हि आगामी निवडणूकीत भाजपा जिंकेल तर बिहार सोबत इतर राज्यात पोट निवडणूकीत सुध्दा भाजपाला मोठे यश मिळाले या निवडणूकीत काॅग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पाणीपत झाले असल्याचे महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी म्हटले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाले याबद्दल शिरपुर भाजपा कार्यालयात पेढे वाटून आनंदोत्सव करण्यात आला त्यावेळी आ. काशिराम पावरा व महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूकीचे प्रभारी होते त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकीत भाजपाला यश मिळाल्याने येथील पक्ष कार्यालयात शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, कार्यालय प्रमुख देवेंद्र देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, मुकेश पाटील, प्रशांत राजपुत, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटक्य विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापू लोहार, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, प्रभाकर सोनवणे, जगन्नाथ पाटील, अनिल बोरसे, पंडीत पाटील, रफीक तेली, पप्पु राजपूत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने