शिरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मेगा भरती, ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात बोराडी येथे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे होते. त्यांनी सदर कार्यक्रमात मार्गदर्शन केले . आदिवासी भागातील सरपंच व माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व आदिवासी भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी अनिल अण्णा गोटे ,सत्यवती पावरा ,तालुका अध्यक्ष रमेश  करनकळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला .,या आयोजित कार्यक्रमात आदिवासी भागातील बंधू-भगिनींना अनिल गोटे यांनी यांनी  मिळालेल्या वनजमिनी पट्ट्यांच्या सातबारा तयार करून देण्याबाबत आश्वासन दिले . शिरपूर तालुक्यात आदिवासी भागात भोळ्याभाबड्या आदिवासींना गांजा सारख्या पिकाची शेती करण्यासाठी भाग पाडणार्‍या पोलीस ,,वनविभाग, महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलत असताना कोणत्याही आदिवासी बांधवावर वनपट्टे जप्तीची कार्यवाही होऊ देणार नाही असे आश्वासन दिले . लवकरच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील वनपट्टे धारकांना स्वतःच्या नावे जमिनी झाल्याचे सातबाराचे वाटप करण्याचा कार्यक्रम नियोजन सुरू आहेत याबाबत वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून व प्रत्येक आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी मी कायदेशीर बाबी पूर्ण करू असे आपल्या अध्यक्षीय भाषणात गोटे यांनी सांगितले ,.यावेळी आदिवासी परिसर पट्ट्यातील कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन सत्यवती पावरा, राष्ट्रवादी महिला आघाडी कन्हैयालाल पावरा पंडित झुंजार पावरा ,यांनी आपल्या परिसरात परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर, प्रशांत भदाणे तालुका अध्यक्ष रमेश करनकाळ,युवक तालुकाध्यक्ष आशिष आहिरे, युवराज पाटील, शहराध्यक्ष युवराज राजपूत ,दत्तू दादा पाडवी डॉक्टर मनोज महाजन, हेमराज राजपूत ,नितीन निकम, राहुल साळुंके ,लिलाचंद लोणारी व  विलास पाटील, परेश शिंपी, अश्फाक शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता पाटील, शिरीष पाटील ,गणेश पाटील बाळासाहेब पाटील व मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवती पावरा यांनी केले असून तालुकाध्यक्ष रमेश आबा डॉक्टर जितेंद्र ठाकूर माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी मार्गदर्शन केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने