शिरपूर - थाळनेर पोलिसांनी शिताफीने सापळा रचत कारवाई करत कारवाईत जुगारचा खेळ उधळला, 8 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिरपूर तालुक्यातील अजंदे बु, होळ व पिंपळे तांडा येथील एकुण 8 जणांवर जुगार खेळताना ही कारवाई करण्यात आली आहे.
आज दि 18 रोजी सायंकाळी 5:10 वाजेच्या सुमारास थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना प्राप्त झालेल्या माहिती नुसार सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस पथक शिरपूर तालुक्यातील अजंदे बुद्रुक गावाच्या शिवारात अनेर नदीजवळ अजंदे मोयदा गावाला जोडण्यात आलेल्या पुलाला लागुन काटेरी झुडपांच्या आडोश्याला मोकळ्या जागेवर काही जण झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी शिताफीने पथकासोबत सापळा रचत जुगार खेळणाऱ्यांंवर छापा टाकला.या कारवाईत (१)अनिल मोतीलाल भोई वय-३५ (२)सुनिल मोतीलाल भोईव य 40(३)प्रविण जयसिंग पवार वय-३५(४)मगबुल सरदार पिंजारी वय 54(५)बाळु नथ्था भिल वय 42(६)कैलास गोरख भोई वय 44 सर्व रा.अजंदे बु.(7)हिलाल दगा भोई वय 47 रा.होळ(8)काशिराम तोताराम राठोड वय 33 रा.उ पिंपळे तांडा ता.शिरपूर आदींना पोलिसांनी ताब्यात घेत घटनास्थळावरुन मोबाईल रोख रक्कमसह 11 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Tags
news
