अक्कलकुवा - अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यात एक कर्तव्याप्रति निष्ठावान असलेली या अंगणवाडी सेविका रेलूताई,वसावे ताईंनी कोरोना काळातसुद्धा मुलं आणि गर्भवती महिलांसाठी रोज नर्मदेच्या विशाल पात्रात 18 किलोमीटर बोट चालवत सेवा देत आहे !
कोरोना काळात या नर्मदा काठावरील अंगणवाड्यात पोषण आहार पोहचवण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा सर्व अडचणीवर मात करत पोषण आहार वाटपाचे काम करत आहे.
एकट्याने बोट चालवत रेणूताई या सकाळी 7:30 पर्यंत अंगणवाडीत पोहचतात आणि दुपार पर्यंत त्या काम करतात. दुपारी जेवणानंतर त्या बोट घेऊन पाड्यावर जात आणि संध्याकाळी उशिरापर्यंत त्या घरी येत.
नर्मदा काठावरील गर्भवती महिला बोटीत बसून पूर्वी एकत्रितपणे पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाडीत येत होते, पण कोरोनाचा भितीमुळे त्यांनी येणं बंद केले होते . त्यामुळे रेलूताई यांनी सहा वर्षांखालील बालकांना आणि गर्भवती महिलांचे आरोग्य आणि विकासावर लक्ष देतात आणि त्याचे वजन करून प्रशासना तर्फे देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे ते वाटप करतात.
गेल्या सहा महिन्यांपासून नर्मदा नदी पार करत आदिवासी पाड्यापर्यन्त त्या पोहचत आहेत. "दररोज बोट चालवून हात दुखत असले तरी लोकांची सेवा करत मी माझं दुःख विसरते अशा त्या म्हणतात."
अशा सेवाव्रती आजच्या खऱ्या अर्थाने सावित्रीमातेच्या लेकीला शत शत नमन..
व यांच्या कार्यास त्रिवार अभिवादन
Tags
news
