शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील सुलवाडे शिवारात एका एकोणावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत म्हसावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती नुसार शहादा तालुक्यातील सुलवाडे येथील योगेश मोहन पाटील यांच्या शेतात रखवालदारास शुक्रवारी सायंकाळी साडे चार च्या सुमारास दुर्गान्दी आली असता त्यांनी पपई च्या शेतात पाहणी केली. त्याना त्याठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला. त्यांनी तात्काळ शेतमालकासह पोलिस पाटील सचिन पवार याना सांगितला. पोलिस पाटील सचिन पवार हे घटनास्थळी येऊन म्हसावद पोलिस स्टेशन चे सपोनि किरण पवार यांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी म्हसावद पोलिस स्टेशन चे सपोनि किरण पवार व पोलीस कर्मचारी दाखल झालेत. हा अनोळखी मृतदेह कोणाचा यासाठी तपास चक्र फिरवले हा मृतदेह सुलतानपुर येथील आकाश भगवान शेमळे या तरुणाचा असल्याचे समजले हा तरुण गेल्या १७ तारखे पासून घरुन बेपत्ता असल्याची फिर्याद् १९ ऑक्टोबर रोजी म्हसावद पोलीसात दाखल करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली मात्र परिसरात या तरुणा चा घात-पात तर नाही अशी चर्चा सुरु आहे. याबाबत ची माहिती म्हसावद पोलीसात सुभाष कोठा शेमळे यांनी दिल्या वरून अ.मृ.राजि.नंबर २२/२०२० सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि किरण पवार यांच्या मार्गदर्शानाख़ाली हवालदार नामदेव बिऱ्हाडे करीत आहे.
Tags
news
