गाव तेथे वाचनालय व व्यायाम शाळा काढणार - आ. पाडवी




नंदुरबार ;-  दि 24 ऑक्टोबर रोजी रांजणी येथे, रेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था रेवानगर संचलित प्रतापपुर गणात सर्व ग्रामपंचायतीत अभ्यासिका सुरु करण्यात आल्या त्यासोबतच स्पर्धा परीक्षांच्या पुस्तके व ग्रंथालय कपाट अभ्यासु विद्यार्थ्यांना आमदार राजेश पाडवी साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
              यावेळी आमदार राजेश पाडवी , डॉ कांतीलाल टाटीया, सभापती यशवंत ठाकरे, जि.प सदस्य प्रकाश वळवी, पं.स सदस्य व संस्था अध्यक्ष दाज्या पावरा, पं.स सदस्य अनिल पवार, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाउपाध्यक्ष गणपत दादा वळवी, भाजपा सहकार सेलचे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रल्हाद बोराणे भाजपा जेष्ठ कार्यकर्ते मंगा बापू, कांतीलाल भापकर, अर्जुन भाऊ,पंढरीनाथ पाडवी,  सुरेश पाडवी, माजी सरपंच कृष्णा पाडवी, रमाकांत दादा व गावातील विध्यार्थी प्रतिष्ठित नागरिक व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दाज्या पावरा यांनी केले त्याच्यात रेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रेवानगर अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन येणाऱ्या दिवसात केले जाईल. आज जागतिक महामारी करोना च्या सावटात पूर्ण जग हे स्थिरावले आहे. पूर्ण व्यवस्था ही कोलमळली असून त्याच्यात विध्यार्थी वर्गही भरळला गेला आहे. पूर्ण महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका असे सर्व काही बंद झाले आहे . त्याच्यातच नंदुरबार जिल्ह्यात नेटवर्किंग चाही मोठ्या प्रमाणात अडचण आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडु नये व परीक्षा ह्या कोणत्याही क्षणी जाहीर होत असल्याने आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थीनी हे अभ्यासाविना परीक्षा ही मुकू नये या उद्देशाने प्रतापपुर गणातील पंचायत समितीच्या 15 वित्त आयोगाची रक्कम खर्च करून विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तके व कपाट वितरित करण्याचे ठरविले आहे. तसेच प्रत्येक गावात या अभ्यासिकेला लागून अभ्यासु विद्यार्थ्यांचा गट निर्माण झाल्यास वाचनालय व व्यायाम शाळा वापरणाऱ्यांची संख्या आपोआपच वाढेल व येणाऱ्या दिवसात ती मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू.
             सभापती यांनी आपल्या मनोगतात पंचायत समितीतील निधी हा योग्य कामासाठी वापरू व आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधा वर योग्य पद्धतीने खर्च केला जाईल.
         डॉ कांतीलाल टाटीया यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, "वाचाल तर वाचाल" या उक्तीप्रमाणे वाचनालय किती महत्त्वाचे आहे याचे विविध उदाहरणे देऊन परीक्षा संदर्भात पुस्तकांबरोबर साहित्य व स्थानिक इतिहासावर ही भर दिला व त्याची पुस्तके उपलब्ध करण्याची सूचना संस्थेला केली. रावलापाणी, प्रतापपुर, अक्रानी यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. आदिवासी क्रांतिकारक यांचा इतिहास खूप मोठा आहे पण तो अजून पर्यंत आपल्या समाजापुढे आला नसल्याने आता विशेषतः लेखन व पुस्तक रुपात येत आहेत तेही आपण ठेवावेत. शासनाच्या पेसा या कायद्यावर पुस्तक लिखाण केले आहे त्याचीही विद्यार्थ्यांना माहिती दिली.
           या कार्यक्रमात बोलताना आ. पाडवी यांनी परिसरातील शेती, वीज , रस्ता ,रोजगार याबरोबरच महाविद्यालयीन विध्यार्थी यांचाही मोठा प्रश्न आहे यांच्यात लहानापासून मोठ्यांनाही वाचनाचा छंद असतो त्यामुळे प्रत्येक गावात वाचनालय व व्यायाम शाळा यासाठी प्रयत्नशील राहेन आपलं आशीर्वाद मी तुमच्या सेवेत असेन. आपण कधीही हाक मारा तुमच्या साठी रात्रंदिवस उपलब्ध असेन. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ मराठे  यांनी केले आभार संस्थेचे सदस्य उपाध्यक्ष रामदास पावरा यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने