युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या निधनामुळे रविवारी द्वार दर्शन (उठावणा, बेसणा)

 


शिरपूर - येथील उद्योगपती, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल (वय ३९ वर्षे) यांचे निधन झाल्याने दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवारी द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) होईल.


कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवारी सायंकाळी ४ ते ७ वाजे पर्यंत द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) होणार आहे.

कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने कृपया कोणीही दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवार सायंकाळी ४ ते ७ वाजेची वेळ सोडून दररोज व इतर अन्य दिवशी भेटायला येऊ नये असे आवाहन अमरिशभाई पटेल, भुपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल यांनी केले आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने