आंतरराष्ट्रीय प्राणी दिवशी प्राण्यांची केली सुटका, थाळनेर पोलीसांनी कारवाई करून प्राण्यांना दिले जीवनदान




थाळनेर:  आज आंतरराष्ट्रीय प्राणी दिवशी प्राण्यांची सुटका करून प्राण्यांना जीवनदान देण्यात थाळनेर पोलिसांना यश आले आहे. 
थाळनेर पोस्टे हद्दीतुन सकाळी 5.30 वाजेच्या  सुमारास शिरपूर-चोपडा रोडने एका कंटेनर मध्ये गोवंशीय जनावर कत्तल करण्याच्या उदेश्याने वाहतूक होणार असलेबाबत  गोपनीय माहिती सहा पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे याना मिळाली होती. या बाबत पथक तयार करून सदर माहितीवरून कंटेनर क्र.UP21 CN 3759  ताब्यात घेण्यात आले असून सदर वाहनात एकूण 60 जनावरांना मुक्त करण्यात आले आहे.यात 2 जनावरे मयत झाले आहेत. या जनावरांना हद्दीतील मांजरोद येथील पांजरपोळ येथे ठेवण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून जखमी जनावरांवर उपचार करण्यात येत असून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. जनावरांची एकूण किंमत 6 लाख व वाहन किंमत 10 लाख असा एकूण 16 लाख रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने