भाजपा तालुका उपाध्यक्ष भास्कर बोरसे यांचा धोबी समाजा तर्फे सत्कार

 


पक्षाशी निष्ठा असलेल्यांना नेते संधी देतात संधीचे सोने करावे : एकनाथराव बोरसे                                                                                                                           शिरपूर : धुळे परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे यांची नुकतीच शिरपूर भाजपा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. माजीमंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचा मार्गदर्शनाखाली शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी भास्कर गोपाल बोरसे (सांगवी) ता. शिरपूर. जि. धुळे यांची शिरपूर भाजपा तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती जाहिर केली त्याबद्दल शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तर्फे भास्कर बोरसे यांचा अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, तालुका उपाध्यक्ष उमेश खैरनार, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, माजी शहराध्यक्ष भगवान वाघ, शहर उपाध्यक्ष नरेश पवार, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, अविनाश पवार, अनिल  बोरसे आदि उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे म्हणाले कि पक्षाशी निष्ठा असलेल्यांनाच पक्षनेते योग्य वेळी योग्य संधी देत असतात पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी सर्वांना सोबत घेवुन एकदिलाने व जोमाने काम करावे तसेच नेत्यांनी राजकारणात (लोकप्रतिनिधी) व पक्षात दिलेल्या संधीचे सोने करावे असे सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने