◆ नाण्यांवर व्हिक्टोरिया राणीची छबी आहे
◆ एकूण एक हजार दोनशे ग्रॅम वजनाची नाणी आहेत
शहादा (प्रतिनिधी) :- प्रकाशा (ता.शहादा) येथील सोनार गल्लीत एका घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू होते. पाया खोदकाम सुरू असतांना पुरातन काळातील चांदीची १०० नाणी आढळून आलीत . नाण्यांवर व्हिक्टोरिया राणीची छबी आहे. एकूण एक हजार दोनशे ग्रॅम वजनाची ही सर्व नाणी महसूल प्रशासनाने ताब्यात घेतली असून , प्रशासकीय कारवाई सुरू आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रतिकाशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा (ता . शहादा) येथील सोनार गल्लीत शांताबाई कथ्थू मोरे हे त्यांच्या भाऊ तुकाराम मोरे यांच्याकडे राहतात. त्यांच्या घरासमोरच शांताबाईंच्या मोरे यांच्या नामे मध्यवस्तीत घराची पडीत जागा आहे . त्या जागेत घरबांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू होते. त्या दरम्यान दोन ते तीन फूट खोदकाम करत असताना मजूर कृष्णा रामा सोनवणे व शिवा कृष्णा सोनवणे यांना अचानक एक मातीचे मडके दिसले . त्यांनी लगेच तुकाराम मोरे यांना याबाबत सांगितले . मडके उघडून पाहिले आसता , त्यात चांदीसदृश नाणी आढळली . तपासले असता ती चांदीचीच असल्याची खात्री झाली .
पाया खोदकाम सुरू असतांना पुरातन काळातील चांदीची १०० नाणी आढळून आलीत . साधारण ती नाणी १८५० ते १८९० या कालावधीतील असावीत या नाण्यांवर व्हिक्टोरिया राणीची मुद्रा व "VICTORIA EMPRESS" आणि दुसऱ्या बाजूस "ONE RUPEE" अशी अक्षरे मुद्रित केलेली आहेत. एकूण एक हजार दोनशे ग्रॅम वजनाची ही सर्व नाणी महसूल प्रशासनाने ताब्यात घेतली असून , प्रशासकीय कारवाई सुरू आहे . यापूर्वीही गावात ठिकठिकाणी खोदकाम करताना पुरातन काळातील मातीच्या वस्तू , मूर्ती सापडल्या आहेत. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले व घटनास्थळी सरपंच सुदाम ठाकरे , पोलिस उपनिरीक्षक कैलास माळी , हवालदार अरुण सैंदाणे , गौतम बोराळे , मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण , ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील , तलाठी डी . एम . चौधरी आदी तत्काळ दाखल झाले , तसेच गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनीही तेथे गर्दी केली . पोलिसांनी सर्व नाणी महसूल प्रशासनाकडे सुपूर्द केली असून , प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे .
