उद्योजकाची तब्बल ६१ लाखांत फसवणूक ◆ संशयितांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल




शहादा (प्रतिनिधी) :- पपईची परस्पर विक्री करून शहादा तालुक्यातील एका उद्योजकाचे तब्बल ६१ लाखांत फसवणूक केल्या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पलक अभय केन्या, अभय अरूण केन्या, अरूण कुमार केन्या सर्व रा. ओवली गाव भिवंडी यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील संशयितांकडून चालवण्यात येणारी कंपनी ही फार्मास्युटिकल म्हणजेच औषधी तयार करण्याची कंपनी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून पपईची पावडर शहादा परिसरातून खरेदी करण्यात येत होते. 
            किशोर नरोत्तम पाटील रा. गुजर गल्ली, शहादा असे फसवणूक झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. पाटील यांची पपईतून द्रव काढून  पावडर तयार करण्याची  एस.आय.बायोझाईम नावाची कंपनी आहे. भिवंडी येथील बालाजी इन्झाईम अँड केमिकल कार्पोरेशन ही कंपनी वेळोवेळी पावडर खरेदी करत होती. दरम्यान संबंधित कंपनी आॅगस्ट २०१९ पासून पाटील यांच्याकडून पावडर खरेदी करत होते. परंतु खरेदीची रक्कम मात्र संबधितांनी दिलीच नव्हती. जुलै २०२० पर्यंत हा प्रकार सुरू होता. मात्र खरेदीदार कंपनी पैसे देण्यास येत न होते. यावरून पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली. व या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने